⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

‘त्या’ महिलेच्या मृत्यूप्रकरणी चौकशी करा : निळे निशाण संघटना

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२२ । सुकळी वनविभागांतर्गत असलेल्या रावेर तालुक्यातील दुईकुंठ येथे विटवे येथील विवाहित महिलेचा मृतदेह आढळला हाेता. ज्योती विलास लहासे असे विवाहित महिलेचे नाव आहे. या महिलेने आत्महत्या केली नसून घातपाताचा संशय असून सखाेल पोलीस चौकशीची मागणी मृत विवाहितेचे वडील अरुण जगन्नाथ अढळे व निळे निशाण संघटनेचे अध्यक्ष आनंद बाविस्कर यांनी विश्रामगृहावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.

२८ डिसेंबरला दुपारी १२ वाजेच्या सुमारास ज्योतीला फोन आला. त्यानंतर ती पाण्याचा डबा भरून शौचास जात असल्याचे सांगितले. मात्र उशीर झाल्याने सर्वांनी तिचा शोध घेत मुक्ताईनगर पोलिसांत तक्रार दाखल केली. ३१ डिसेंबरला ज्योतीच्या मृत्यूची माहिती पोलिसांनी दिली. त्या दिवसापासून दीपक मनोरे हा ज्योतीसंदर्भात माहिती गोळा करत असल्याचे समजले. त्याने २५ डिसेंबर रोजी मुलीसोबत अतिप्रसंग केल्याचा आरोपही त्यांनी केला. मृताच्या मोबाइलचा गेल्या सहा महिन्याचा सीडीआर तपासावा, लोकेशन आणि रुटची माहिती मागवून विश्लेषण करावे, मृताच्या गावी विटवे येथे बारकाईने गुप्त चौकशी करावी, अशी मागणी अरुण अढळे, आनंद बाविस्कर यांनी केली आहे. यावेळी जिल्हा नियोजन समितीचे महेश तायडे, रावेर तालुका सरचिटणीस सुधीर सैगमिरे आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा :