⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

महागाईचे चटके ! मे महिन्यात महागाईने मोडला 14 महिन्यांचा विक्रम

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ जून २०२२ । देशात वाढत्या महागाईने सर्वसामान्य होरपळून निघत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून कमी होण्याचे नाव घेत नाहीय. दरम्यान, केंद्र सरकारने आज मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीत मे महिन्यातील घाऊक महागाईचा दर (WPI महागाई) 15.88 या विक्रमी पातळीवर पोहोचला आह. जो एप्रिल महिन्यात 15.08 टक्के होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा घाऊक महागाईचा दर वाढला आहे. मे 2021 मध्ये घाऊक महागाई दर 13.11 टक्के होता. सोमवारी संध्याकाळी आलेल्या आकडेवारीनुसार किरकोळ महागाई दरात घट झाली असली तरी घाऊक महागाई दर वाढला आहे.

देशात सध्या खाद्यपदार्थांच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. याचसोबत पेट्रोल-डिझेल आणि विजेच्या महागाई दरात वाढ झाल्याने घाऊक महागाई वाढली आहे. या वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, घाऊक महागाई दर एप्रिलमध्ये 15.08 टक्के, मार्चमध्ये 14.55 टक्के, फेब्रुवारीमध्ये 13.11 टक्के आणि जानेवारी 2022 मध्ये 12.96 टक्के होता. आकडेवारीनुसार, मे हा सलग १४ वा महिना आहे, जेव्हा घाऊक महागाईचा दर १० टक्क्यांच्या वर आहे.

प्राथमिक गरज महाग
एप्रिलमधील 8.88 टक्क्यांवरून मे महिन्यात अन्नधान्य महागाई 10.89 टक्क्यांवर पोहोचली आहे. कच्चे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू (8.52 टक्के), खाद्यपदार्थ (2.40 टक्के), खनिजे (1.73 टक्के) आणि खाद्येतर वस्तूंच्या (1.52 टक्के) किमती वाढल्या.

अन्नधान्य, धान, गहू, कडधान्ये, भाजीपाला, बटाटे, कांदे, फळे, दूध, अंडी आणि मांस आणि मासे यासारख्या पदार्थांचा समावेश होतो. इंधन आणि वीज निर्देशांक, ज्यात LPG आणि पेट्रोलियम सारख्या वस्तूंचा समावेश होतो.

किरकोळ महागाईत घट
सोमवारी जाहीर झालेल्या मे महिन्यातील किरकोळ महागाई दर खाली आला असून आता तो ७.०४ टक्क्यांवर आला आहे. अन्नधान्य चलनवाढीचा दर ८.३१ टक्क्यांवरून ७.९७ टक्क्यांवर आला आहे. केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 8 आणि 6 रुपयांनी कपात केली आहे. यानंतर राज्यांनीही व्हॅट कमी केला.

आरबीआयने रेपो दरात वाढ
याशिवाय जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी सरकारने इंधनाच्या दरात कपात केली होती. दरम्यान, काही दिवसांपूर्वी, 6-8 जून रोजी झालेल्या RBI च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत, महागाई आराम पातळीच्या वर राहिल्याने प्रमुख व्याजदरात 50 बेस पॉइंट्स (BP) ने वाढ करण्याची घोषणा करण्यात आली होती. आहे. रेपो रेट 0.50 टक्क्यांनी वाढून 4.90 टक्के झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज किंवा वाहन कर्ज घेणाऱ्यांच्या ईएमआयमध्ये वाढ झाली आहे. लाइव्ह टीव्ही