---Advertisement---
जळगाव जिल्हा राजकारण

मी 100 वेळा सांगितलं..; रक्षा खडसेंबाबत आमदार चंद्रकांत पाटीलांच्या सूचक वक्तव्य, राजकीय चर्चांना उधाण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२४ । महायुतीकडून रावेर लोकसभा मतदार संघातून भाजपच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु रक्षा खडसेंच्या उमेदवारीवरून पक्षांतर्गत नाराजीनाट्य समोर आले होते. अनेकांनी राजीनामेही दिल्याचे समोर आले होते. तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली. मात्र आता आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसे यांच्याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Raksha Khadse Chandrakant patil jpg webp

नेमकं काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
मी 100 वेळा सांगितलं आहे की, नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मी मानतो आहे. त्यांच्यासाठी मी काम करणार आहे. मात्र रक्षा खडसेंना माझी आवश्यकता नसेल तर समजून घेऊ. मी महायुतीचा घटक आहे. त्याप्रमाणे काम करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

---Advertisement---

खडसेंचे कुटुंब नेहमी माझ्या विरोधात बोलतात. त्या प्रकारे महायुतीतील घटक रक्षा खडसेही माझ्या विरोधात बोलायला लागल्या का? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला आहे. रक्षा खडसे यांना माझ्या मदतीची आवश्यकता नाही. त्यांनी आधीच त्यांनी डिक्लेअर केले आहे की, मतदारसंघात खूप मोठा विकास केला आहे. खासदारांना असं वाटत असेल की यांची आम्हाला आवश्यकता नाही तर तेही आम्ही समजून घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून उद्योजक श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---