रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; तब्बल 11,127 पदे भरली जाणार, पात्रता काय असणार?

फेब्रुवारी 25, 2026 12:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । जर तुम्हाला रेल्वेमध्ये सरकारी नोकरी हवी असेल तर सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. रेल्वे मंत्रालयाने ११,००० हून अधिक असिस्टंट लोको पायलट पदांसाठी नवीन भरतीचा मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयानंतर, भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. भरतीची पूर्णपणे जबाबदारी आरआरबीची असेल. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन असेल आणि अधिसूचना जारी होताच उमेदवार फॉर्म भरू शकतील.

railway bharti

रेल्वेतील एएलपी पदासाठी सर्वाधिक पदे ही ईस्ट कोस्टमध्ये भरली जाणार आहेत. या भरती मोहिमेअंतर्गत, देशभरातील विविध रेल्वे झोनमध्ये एकूण ११ हजार १२७ पदे भरली जातील. याबाबत नवीन अधिसूचना लवकरच जाहीर केली जाईल. त्यात मध्य रेल्वेमध्ये १,४००, पूर्व मध्य रेल्वेमध्ये ७०० आणि पूर्व तटीय रेल्वेमध्ये १,६२५ पदे आहेत. याव्यतिरिक्त, पूर्व रेल्वेमध्ये ६०८, उत्तर मध्य रेल्वेमध्ये ४५७ आणि उत्तर रेल्वेमध्ये ७४० पदांसाठी भरती केली जाईल. तर दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये सर्वाधिक १,५३१ पदे आहेत, ईशान्य सीमांत रेल्वेमध्ये १,२७६ पदे आहेत.

पात्रता
रेल्वेतील असिस्टंट लोको पायलट पदासाठी उमेदवाराने १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेल असावे. याचसोबत मान्यताप्राप्त विद्यापीठातून फिटर, इलेक्ट्रिशियन, इनस्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराइट, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, वायरमॅन, ट्रॅक्टर मॅकेनिक अशा विविध ट्रेडमध्ये आयटीआय केलेले असावे. याचसोबत अप्रेंटिसशिप केलेली असावी. या नोकरीसाठी १८ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

वयोमर्यादा :
या भरतीत सहभागी होण्यासाठी किमान वय १८ वर्षे आहे, तर कमाल वय मर्यादा ३० वर्षे आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयात सूट दिली जाईल. ओबीसी उमेदवारांना वयात ३ वर्षांची सूट मिळेल, तर एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्षांची सूट मिळेल. माजी सैनिक आणि इतर राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही नियमांनुसार सूट मिळेल.

पगार
सहायक लोको पायलट पदासाठी उमेदवारांना पे लेव्हल २ नुसार १९,९०० रुपये पगार मिळेल. याचसोबत इतर भत्ते आणि सुविधादेखील दिल्या जातील. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड सीबीटी-१, सीबीटी २ आणि कागदपत्र पडताळणी, मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now