⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

आणखी एका सरकारी बँकेने करोडो ग्राहकांना दिला झटका, उद्यापासून ‘हा’ नियम लागू होणार

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जुलै २०२२ । सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँकेने (Indian Overseas Bank) आपल्या करोडो ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने वेगवेगळ्या कालावधीच्या कर्जावरील व्याजदरात वाढ केली आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने केलेला हा बदल 10 जुलैपासून लागू होणार आहे. बँकेने विविध मुदतीच्या कर्जावरील निधी आधारित व्याज दरात (MCLR) 0.10 टक्के वाढ केली आहे.

10 जुलैपासून नवीन दर लागू होतील
IOB ने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत असे म्हटले आहे की MCLR मध्ये 10 जुलै 2022 पासून सुधारणा करण्यात आली आहे. बँकेचे नवे दर उद्यापासून म्हणजेच १० जुलैपासून लागू होतील. या बदलानंतर MCLR आधारित व्याजदर ६.९५ टक्क्यांवरून ७.५५ टक्के होईल. एक वर्षासाठी MCLR 7.55 टक्के करण्यात आला आहे. पूर्वी तो 7.45 टक्के होता.

MCLR 6.95-7.50 टक्के वाढवला
वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि गृहकर्ज फक्त MCLR शी जोडलेले आहेत. बँकेने दोन आणि तीन वर्षांच्या कर्जासाठी MCLR 0.10 टक्क्यांनी वाढवून 7.55 टक्के केला आहे. इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने एक दिवस ते सहा महिन्यांच्या कालावधीसाठी MCLR 0.10 टक्क्यांनी 6.95-7.50 टक्क्यांनी वाढवला आहे.

RLLR दरही वाढला
इंडियन ओव्हरसीज बँक (IOB) ने देखील 10 जुलैपासून रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, 10 जुलैपासून हा दर 7.75 टक्क्यांपर्यंत वाढेल. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे.

IOB पूर्वी, कॅनरा बँकेने निधी आधारित व्याज दर (MCLR) 0.10 टक्क्यांनी वाढवलेला आहे. याशिवाय बँक ऑफ बडोदा 0.1 ते 0.2 टक्के, एचडीएफसी बँक 0.35 टक्क्यांनी वाढली आहे. आरबीआयने मे आणि जूनमध्ये रेपो दरात 90 बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. यानंतर बँकांनीही व्याजदरात वाढ केली आहे.