भारतीय नौदलात १२वी पास तरुणांसाठी मोठी पदभरती ; भरघोस पगार मिळणार, पात्रता काय?

मार्च 11, 2026 3:49 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय नौदलात नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय नौसेनेत मेडिकल ब्रँचमध्ये भरती जाहीर करण्यात आली असून या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया लवकरच सुरु केली जाईल. अर्जप्रक्रिया सुरु झाल्यावर तुम्ही www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. Indian Navy Bharti 2026

indiannavy

भारतीय नौदलातील या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया १४ मार्च २०२६ रोजी सुरु होणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करायचे आहे.Indian Navy Recruitment 2026

भरतीसाठी पात्रता काय?

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी स्ट्रीममध्ये पास असणे गरजेचे आहे.या नोकरीबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ मध्ये झाला असावा.

इतके स्टायपेंड मिळणार

या नोकरीसाठी उमेदवारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान त्यांना १४,६०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. यानंतर लेवल ३ नुसार डिफेन्स पे मॅट्रिकनुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.

अर्ज शुल्क किती आहे?

या भरतीसाठी पुरुष आणि महिला दोघेही अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांनी अर्ज केल्यावर ₹५५० परीक्षा शुल्क भरावे लागेल.

सिलेक्शन प्रोसेस

या नोकरीसाठी सर्वात आधी इंडियन नेव्ही एंट्रस टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील.यासाठी १ तासाचा वेळ दिला जाईल. यानंतर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर तुमची पुन्हा परीक्षा होणार आहे. यामध्ये इंग्रजी, सायन्स, बायोलॉजी आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.joinindiannavy.gov.in वर जायचे आहे.
यानंतर करिअर सेक्शनमध्ये SSR (मेडिकल असिस्टंट)वर क्लिक करायचे आहे.
यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर लॉग इन करा आणि सर्व माहिती भरायची आहे.
याचसोबत फोटो आणि शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now