जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय नौदला अंतर्गत अग्निवीर एमआर म्यूजिशियन पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. विशेष दहावी पास असलेल्या तरुणांना ही मोठी संधी असणार आहे. या भरतीअंतर्गत, तरुणांना भारतीय नौदलात ४ वर्षांसाठी सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळेल. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ५ जुलैपासून सुरु होणार आहे. या नोकरीसाठी तुम्ही www.joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करु शकतात. १३ जुलैपर्यंत इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकणार आहे. Indian Navy Agniveer Bharti

आवश्यक पात्रता :
इंडियन नेव्हीमधील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून १०वीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले असावे. याचसोबत स्कूल एज्युकेशनद्वारा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. फक्त अविवाहित महिला आणि पुरुष या नोकरीसाठी अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करताना शैक्षणिक पात्रतेसोबतच संगीताची आवड असणे गरजेचे आहे. त्यांना लय, सूर आणि गाण्याचे ज्ञान असावे. त्यांना कोणतेतरी वाद्य वाजवता येणे गरजेचे आहे. किबोर्ड, स्ट्रिंग, विंग इन्स्ट्रुमेंट, ड्रम किट याचे ज्ञान असावे.
या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मॅट्रिक परिक्षेतील गुणांच्या आधारे केली जाणार आहे. त्यानंतर फिटनेस टेस्ट, संगीत क्षमता टेस्ट आणि मेडिकल टेस्टद्वारे केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करताना तुम्हाला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाहीये.
वय किती असावे
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवाराची जन्मतारीख १ सप्टेंबर २००४ ते २९ फेब्रुवारी २००८ दरम्यान असावी. याचा अर्थ असा की ज्यांचा जन्म या दोन तारखांना किंवा त्या दरम्यान झाला आहे तेच अर्ज करण्यास पात्र असतील. दोन्ही तारखा देखील समाविष्ट असतील म्हणजेच जर एखाद्याचा जन्म १ सप्टेंबर २००४ किंवा २९ फेब्रुवारी २००८ रोजी झाला असेल तर ते देखील अर्ज करू शकतात.
किती पगार दिला जाईल?
अग्निवीर संगीतकार पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना पहिल्या वर्षी दरमहा ३०,००० रुपये पगार मिळेल. दुसऱ्या वर्षी हा पगार दरमहा ३३,००० रुपये होईल. तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी अनुक्रमे हा पगार आणखी वाढेल. यासोबतच, अग्निवीरांना विहित नियमांनुसार जोखीम भत्ता, रेशन, कपडे आणि इतर भत्ते देखील दिले जातील.












