जळगाव लाईव्ह न्यूज । भरती संदर्भ । देश सेवेशी संबंधित सरकारी नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. तुम्ही भारतीय तटरक्षक दलात अधिकारी बनू शकता. भारतीय तटरक्षक दलाने भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ज्यामध्ये एकूण १७० पदे भरली जाणारा आहे. Indian Coast Guard Bharti 2025

या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ जुलै २०२५ रात्री ११:३० वाजेपर्यंत आहे. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ज्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी joinindiancoastguard.cdac.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. Indian Coast Guard Recruitment 2025

पदाचे नाव :
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) – १४० जागा
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)- ३० पदे
शैक्षणिक पात्रता:
असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD) -: (i) पदवीधर (ii) 12वी (Maths & Physics)उत्तीर्ण
असिस्टंट कमांडंट – टेक्निकल: इंजिनिअरिंग पदवी (Naval Architecture/ Mechanical/Marine/Automotive / Mechatronics/ Industrial and Production/ Metallurgy/Design/Aeronautical /Aerospace /Electrical/ Electronics/ Telecommunication/Instrumentation/Instrumentation and Control/ Electronics & Communication / Power Engineering / Power Electronics.)
वयाची अट :
अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचे किमान वय २१ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे असावे. उमेदवारांचे वय १ जुलै २०२६ च्या आधारावर मोजले जाईल. उमेदवारांची जन्मतारीख १ जुलै २००१ ते ३० जून २००५ दरम्यान असावी.
अर्ज शुल्क : General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
पगार : उमेदवारांना वेतन पातळी १० नुसार दरमहा ५६,१०० रुपये मिळतील.












