नोकरी संधी

भारतीय हवाई दलात 12वी ते ग्रॅज्युएट्स पाससाठी मोठी संधी; तब्बल एवढ्या जागांवर भरती?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । भारतीय हवाई दलात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी चांगली माहिती समोर आली आहे. भारतीय हवाई दलाने FCAT 01/2025 साठी अधिकृत अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आज म्हणजेच 02 डिसेंबर 2024 पासून सुरू होत आहे. आणि पात्र 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज फक्त आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. बारावी ते ग्रॅज्युएट्स पास तरुणासांठी नोकरी मिळविण्याची ही सुवर्णसंधी आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
AFCAT एंट्री
1) फ्लाइंग- 
30
शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE/B.Tech.
2) ग्राउंड ड्युटी (टेक्निकल) -189
शैक्षणिक पात्रता :
 (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics and Mathematics) (ii) 60% गुणांसह BE/B.Tech.
3) ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) -117
शैक्षणिक पात्रता 
: 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी/B. Com./60% गुणांसह BBA/BMS/BBS/CA/CMA/CS/CFA. किंवा B.Sc (फायनान्स)
NCC स्पेशल एंट्री
4) फ्लाइंग –
 10% जागा
शैक्षणिक पात्रता : NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र.

परीक्षा शुल्क
FCAT फ्लाइंग पोस्टसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय 20-24 वर्षे असावे. तर ग्राउंड ड्युटी तांत्रिक/नॉन-टेक्निकल पदांसाठी वयोमर्यादा २०-२६ वर्षे असावी. अर्ज करताना, सर्व श्रेणीतील उमेदवारांना 500 रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल. NCC स्पेशल एंट्री: फी नाही.
निवड पद्धत : लेखी परीक्षा, मुलाखत, प्रत्यक्ष, कागदपत्र पडताळणी इत्यादीद्वारे FCAT मध्ये उमेदवारांची निवड केली जाईल. भरतीशी संबंधित इतर कोणत्याही माहितीसाठी, उमेदवार भारतीय हवाई दलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button