जळगाव लाईव्ह न्यूज । पदवी पूर्ण केल्यानंतर सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँकमध्ये भरती जाहीर झाली. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने एक्झिक्युटिव्ह पदांसाठी ही भरती जाहीर केलीय. या भरतीद्वारे एकूण 344 रिक्त पदे भरली जाणार आहे. India Post Payments Bank Bharti 2025

या पदांसाठी अर्ज प्रक्रिया ९ ऑक्टोबरपासून सुरू झाली. इच्छुक उमेदवार IPPB च्या अधिकृत वेबसाइट ippbonline.com ला भेट देऊन २९ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

आवश्यक पात्रता:
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी असावी. ज्या उमेदवारांनी मुक्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केली आहे ते देखील अर्ज करू शकतात. अर्जदारांचे वय २० ते ३५ वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे, ज्याचे वय १ ऑगस्ट २०२५ रोजी मोजले जाईल.
या भरतीअंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना दरमहा ₹३०,००० पगार मिळेल. सुरुवातीची नियुक्ती एका वर्षासाठी असेल, जी कामगिरीच्या आधारे आणखी एका वर्षासाठी वाढवता येईल. सर्व उमेदवारांना अर्ज शुल्क ₹७५० भरावे लागेल. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मेरिट लिस्टद्वारे होणार आहे. तुम्हाला ग्रॅज्युएशमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड होणार आहे.
अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्ही www.ippbonline.com या वेबसाइटवर जावे.
यानंतर Current Openings मध्ये जाऊन Gramin Dak Sevak from Department of Post to IPPB as Executive यावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्यासमोर डायरेक्ट वेबसाइट ओपन होईल. त्यावर रजिस्ट्रेशन करायचे आहे.
यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, ई मेल आयडी टाकायचा आहे.
यानंतर रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करावे आणि फॉर्म भरावा. फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ठेवा.












