जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी नोकरी शोधणाऱ्या दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीबाबत एक मोठे अपडेट आले आहे. पोस्ट ऑफिस 25,000 पेक्षा जास्त ग्रामीण डाक सेवकांची भरती करणार आहे.

या भरतीबाबतची अधिसूचना जारी झाल्यानंतर, उमेदवार अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट देऊन निर्धारित मुदतीत भरती फॉर्म भरू शकतात. ऑनलाईन पद्धतीने भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत. इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेची सर्वात खास बाब म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात बसूनही तुम्ही भरतीसाठी आरामात अर्ज करू शकता.

या भरती प्रक्रियेसाठी लवकरच अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमदेवारांना कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही. उमेदवारांची निवड गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाते. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करताना आपल्याला दहावी मार्क शीट लागणार आहे. दहावीत गणित आणि स्थानिक भाषा असणे आवश्यक आहे.
गेल्या काही दिवसांपासून उमेदवार पोस्ट ऑफिसच्या भरतीयेची वाट बघत होते, शेवटी भरती प्रक्रियेला सुरूवात झाली. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी ही मोठी संधी हातातून जाण्याच्या आता भरती प्रकियेसाठी अर्ज करावीत. दहावीतील मार्कानुसार, उमेदवाराची निवड केली जाईल. शिवाय उमेदवाराला सायकल देखील चालवता आली पाहिजे.












