जळगाव लाईव्ह न्यूज । ७ मे २०२५ । जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताकडून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने या हल्ल्याच्या बरोबर १५ दिवसांनंतर बुधवारी रात्री १.३० वाजता ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला.

बहावलपूर, मुरीदके, सियालकोट, बाग, कोटली आणि मुझफ्फराबाद सह इतर भागात हे हल्ले करण्यात आले. भारतीय लष्कराने स्पष्ट केले आहे की, लक्ष्य फक्त दहशतवादी तळ होते आणि कोणत्याही पाकिस्तानी लष्करी तळावर हल्ला झाला नव्हता.
मिळालेल्या माहितीनुसार, भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) दहशतवादी तळांवर हवाई हल्ले केले आहेत. ही तीच ठिकाणे आहेत जिथून भारतावर दहशतवादी हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते.भारतीय सैन्य दलाच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राइक केला. कारवाईनंतर पाकिस्तान हादरलं आहे. भारताने मुजफ्फराबाद, कोटली आणि बहावलपूरमध्ये मोठा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला. पाकिस्तानी माध्यमांच्या दाव्यानंतर काही वेळातच भारत सरकारनेही या हल्ल्याची अधिकृतपणे पुष्टी केली.
कुठल्या-कुठल्या ठिाकणी हे स्ट्राइक केले?
कुठल्या-कुठल्या ठिाकणी हे स्ट्राइक केले? आणि ते इंटरनॅशनल बॉर्डरपासून किती लांब आहेत?
बहावलपुर : हे आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळपास 100 किलोमीटर अंतरावर आहे. इथे जैश-ए-मोहम्मदच मुख्यालय आहे. भारतीय सैन्य दलाच्या कारवाईत हे उद्धवस्त झालय.
मुरीदके : हा दहशतवादी तळ आंतरराष्ट्रीय सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे. इथे लश्कर-ए-तैयबाचा तळ होता. मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्याशी याचा संबंध होता. गुलपुर : हा दहशतवादी तळ LoC (पुंछ-राजौरी) पासून 35 किलोमीटर दूर आहे.
लश्कर कॅम्प सवाई : POK च्या तंगधार सेक्टरमध्ये 30 किलोमीटर आत आहे.
बिलाल कॅम्प : हा जैश-ए-मोहम्मदचा लॉन्चपॅड आहे. हा तळ दहशतवाद्यांना सीमेपलीकडे पाठवण्यासाठी वापरला जात होता.
कोटली : LOC पासून 15 किमी अंतरावर लष्करचा तळ होता. 50 पेक्षा जास्त दहशतवाद्यांना सामावून घेण्याची क्षमता होती.
बरनाला कॅम्प : हा दहशतवादी तळ LOC पासून 10 किलोमीटर अंतरावर आहे.
सरजाल कॅम्प : सांबा-कठुआसमोर इंटरनॅशनल बॉर्डरपासून 8 किमी अंतरावर हा जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा प्रशिक्षण तळ होता.
मेहमूना कॅम्प (सियालकोट जवळ)– हा हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी प्रशिक्षण तळ होता. आंतरराष्ट्रीय सीमेपासून 15 किमी अंतरावर होता.
I Love Indian Army ❤️
I Love Indian Army ❤️
Jay Hind