सरकारची मोठी घोषणा! सुकन्यासह लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले, जाणून घ्या नवे दर

डिसेंबर 30, 2023 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२३ । नवीन वर्षापूर्वी केंद्र सरकारने सर्वसामान्यांना आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने सुकन्या समृद्धी योजनासह काही लहान बचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​आहेत. सरकारच्या घोषणेनुसार 3 वर्षांच्या बचत योजनेवरील व्याजदरात 0.1 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. सुकन्या समृद्धी योजनेवरील व्याजदरात 0.2% वाढ करण्यात आली आहे.

sukanya yojna jpg webp

यांनतर आता सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ८.२ टक्के केला आहे, तर तीन वर्षांच्या मुदत ठेवीचा दर ७.१ टक्के केला आहे. यापूर्वी सुकन्या समृद्धी योजनेचे व्याज ८ टक्के आणि तीन वर्षांच्या टीडीचे व्याज ७.१ टक्के होते. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) च्या व्याजात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही बदल झालेला नाही.

पीपीएफचे व्याज कमी झाले
PPF व्याजातील शेवटचा बदल एप्रिल-जून 2020 मध्ये झाला होता, जेव्हा तो 7.9 टक्क्यांवरून 7.1 टक्के करण्यात आला होता. गेल्या वेळी केंद्र सरकारने पंचवार्षिक आरडी योजनेत कोणताही बदल केला नव्हता. आजच्या घोषणेपूर्वी केंद्र सरकारच्या स्मॉल सेव्हिंग स्कीमचे व्याजदर ४ टक्के ते ८.२ टक्के दरम्यान होते.

जानेवारी-मार्च 2024 चे व्याज
पोस्ट ऑफिस बचत खात्यावर 4% व्याज
एक वर्षाच्या ठेवीचा व्याज दर ६.९ टक्के
2 वर्षांच्या ठेवीचा व्याज दर 7.0 टक्के
३ वर्षांच्या ठेवींवर ७.१ टक्के व्याजदर
5 वर्षांच्या मुदत ठेवीवर 7.5 टक्के व्याज आहे
5 वर्षांच्या आरडी योजनेवर 6.7 टक्के व्याज आहे
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) व्याज 7.7 टक्के
किसान विकास पत्र व्याज 7.5 टक्के
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) व्याज 7.1 टक्के
सुकन्या समृद्धी खात्यावर (SSY) व्याज ८.२ टक्के आहे
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSSY) व्याज 8.2 टक्के आहे
मासिक उत्पन्न खाते व्याज 7.4 टक्के

कोणत्या योजना बदलल्या नाहीत?
लहान बचत योजनांतर्गत, जानेवारी-मार्च 2024 या तिमाहीसाठी केवळ सुकन्या समाधि योजनेवर (SSY) व्याज आणि 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींमध्ये वाढ करण्यात आली आहे. इतर सर्व लहान बचत योजना अपरिवर्तित ठेवल्या आहेत. कृपया लक्षात घ्या की पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमवरील व्याज हे बँक एफडीवरील व्याजापेक्षा जास्त आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related Stories