---Advertisement---
कृषी जळगाव जिल्हा बातम्या

शेतकऱ्यांचे खरिपाचे बजेट कोलमडणार ; बियाण्यांच्या किमतीत मोठी वाढ, पहा नवे दर..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२४ । खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी वर्ग खरीप पूर्व मशागतीच्या कामांत व्यस्त आहे. मात्र अशातच बियाण्यांच्या दरात २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली. मका, ज्वारी, मूग बियाण्यांच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५० ते ४०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

farmer biyane jpg webp webp

आधीच घरात पडलेला कापूस, सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. यात रासायनिक खात्यांचे दरही गगनाला भिडले आहे. यातच आता बियाण्यांचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे बजेट पूर्णपणे कोलमडले आहे.

---Advertisement---

दरम्यान, शेतकऱ्यांना १ एप्रिलपासून पीक कर्ज वाटप सुरू झालेले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी शेतकरी खते व बियाणे खरेदी करत आहेत. यंदा खतांच्या पोटॅश वगळता रासायनिक खतांच्या किमतीत फारशी दरवाढ झालेली नाही. सन २०२१-२२ मध्ये पोटॅशची बॅग ८९० रुपयांना होती. यंदा पोटॅशचे दर १६५५ रुपयांपर्यंत दुपटीने वाढले आहेत.

शासनाने खतांच्या किमती ग्रेडनिहाय निश्चित केलेल्या आहेत. मोठ्या व छोट्या उत्पादकांच्या किमती त्याच आहेत. खतांच्या किमतीत दरवाढ झालेली नाही. सुपर फॉस्फेट आता झिंक व बोरान या घटकांसह उपलब्ध झालेले आहे. १०.२६.२६ खताच्या बॅगची किंमत १४७०, २४.२४.० खताची बॅग १७०० रुपये या खतांच्या किमतीत दरवाढ झालेली नाही. शासनाने खतांवरील सबसिडी वाढवल्यामुळे तूर्तास खतांच्या दरात वाढ झालेली नाही. २०.२०.०१३ खताच्या बॅगची किंमत १४७० रुपयांवरून १३५० रुपये कमी झाली असल्याचे कृषी केंद्र परवानधारकांनी सांगितले.मात्र दुसरीकडे ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर बियाण्यांचे दर वाढले आहे. वाढवण्यात आलेल्या बियाण्यांची किंमत कमी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

बियाणांचे दर असे :
गेल्या वर्षी २०२३ मध्ये मकाचे दर १६०० रुपये होते. ते आता २००० रुपयांवर गेला आहे. उडीद ११०० रुपायांवरून १४५० रुपायांवर, मूग ९५० रुपयांवरून १२५० रुपयावर, ज्वारी ४०० रुपयांवरून ६५० रुपयावर गेले आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---