---Advertisement---
गुन्हे रावेर

अरे बापरे..! वादळामुळे झोक्यासहीत 4 महिन्याची चिमुरडी उडाली, रावेरमधील घटना

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ जून २०२३ । गेल्या दोन तीन दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील काही भागाला वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे. त्यात रावेर तालुक्यात देखील वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. धक्कादायक म्हणजे गुरुवारी आलेल्या वादळामुळे घरावरील पत्रे, अँगल, पाईप व झोक्यासहीत 4 महिन्याची चिमुरडी उडून गंभीर जखमी झाली. ही घटना रावेर येथील ईदगाह रोडवरील मदिना कॉलनीत घडली असून जखमी चिमुरडीवर बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर तिचे आई, वडील किरकोळ जखमी झाले आहे.

raver jpg webp webp

नेमकी घटना काय?
रावेर येथील ईदगाह रोडवरील मदिना कॉलनीतील हरीसखान रईसखान यांच्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील घराचे पत्रे, अँगल व पाईपासह चक्रीवादळामुळे उडाले होते. घराच्या पाईपाला दोरीचा झोका बांधून त्यांची अनबिया हरीशखान (वय ४ महिने) ही झोपली होती. मात्र पत्र्यासहित पाईप, झोका व त्यातील बालीका वादळामुळे उडून घराच्या मागील बाजूस सुमारे शंभर ते दीडशे फूट अंतरावर पत्र्यासह खाली पडला.

---Advertisement---

पाऊस व वादळ शांत झाल्यावर या मुलीची शोधाशोध करण्यात आली. सदर बालिका पत्र्याखाली गंभीर अवस्थेत मिळून आली. तिला तात्काळ बऱ्हाणपूर येथील ऑल इज वेल रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहे. दरम्यान तिचे वडील हरीस खान रईस खान (वय ३०) व त्यांची पत्नी आशयमाबी (वय २८) हे किरकोळ जखमी झाले आहेत. माजी नगरसेवक अयुबखान, शेख सादिक, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष शेख मेहमूद यांनी भेट दिली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---