Paldhi News-जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. दुपारी पाळधी (Paldhi) येथील शासकीय विश्रामगृह नविन इमारतीचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री यांच्याहस्ते पार पडला.
यावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार राजूमामा भोळे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया आदी उपस्थित होते.