⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

पिंप्री येथे दरोडेखोरांनी दोन लाखांचा ऐवज लांबवला

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांच्या टोळीने तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे एकाचवेळी शेजारी-शेजारी असलेल्या दोन घरांना टार्गेट करीत रोकडसह सोन्या-चांदीचा ऐवज मिळून दोन लाखांचा ऐवज लांबवला. हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

मध्यरात्री साधली संधी
पिंपी खुर्द गावातील जुना चिकूचा मळा, पिंप्री खुर्द येथे राहत असलेल्या लोटू मुरलीधर पाटील (73) यांच्या बंद घराच्या कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सोने चांदीच्या दागिन्यांसह रोकड लांबवली. पाटील हे दोन दिवसांपासून दवाखान्याच्या कामानिमित्त बाहेगावी असल्याची संधी चोरट्यांनी साधली शिवाय पाटील यांच्या घराच्या शेजारी असलेले संदीप किसन खंडू शिंदे (38) यांच्या बंद घरातूनही चोरी केली मात्र नेमका चोरीला गेलेल्या ऐवजाची माहिती कळू शकली नाही.

पोलिस अधिकार्‍यांची धाव
चोरीची माहिती मिळताच धरणगाव पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक निरीक्षक जिभाऊ पाटील, सहा.फौजदार राजेंद्र कोळी, मोती पवार, समाधान भागवत, हवालदार करीम सय्यद, कैलास पाटील, समाधान भागवत आदींसह श्वान पथकासह पोलिस कर्मचार्‍यांनी धाव घेतली. ठसे तज्ञ यांनाही ठसे टिपण्याचा प्रयत्न केला. सुमारे दोन लाखांवर ऐवज लांबवण्यात आल्याची माहिती आहे.