जळगाव लाईव्ह न्यूज । १ सप्टेंबर २०२३ । महाराष्ट्रासह संपूर्ण देश दुष्काळाच्या वेशीवर असून पावसाअभावी खरीप हंगाम धोक्यात आला आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, हंगामातील पहिल्या मोजणीस पारोळा कृउबात मुगास १४ हजार रुपयांचा भाव मिळाला. यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
पारोळा येथे दिनांक ३१ रोजी मूग काटा मोजणी होऊन यात या हंगामातील पहिल्या मोजणीस तब्बल १४००१ रूपयांचा भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. या वेळी काटा मोजणी सभापती डॉ. सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली.
सावखेड होळ येथील शेतकरी बाबुराव धनसिंग पाटील यांच्या शेतातील मूग मोजला गेला. या वेळी उपसभापती सुधाकर पाटील, सचिव दीपक पाटील, व्यापारी किरण वाणी, नामदेव वाणी, संदेश वाणी, रतन महाजन यांच्यासह काही संचालक उपस्थित होते.
या वेळी डॉ. सतीश पाटील यांनी येणाऱ्या काळात पारोळा बाजार समितीकडून शेती मालास रास्त भाव दिला जाईल, असे सांगितले. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असला तरी यंदा उत्पादन कमी आहे.