काकाच्या घरात पुतण्यांनी मारला डल्ला, ४ लाखांचा ऐवज लंपास

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जून २०२२ । पुतण्यांनेच काकाच्या घरात डल्ला मारून तब्ब्ल ४ लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना पिंपळगाव येथे घडलीय. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

सुमन गोपीचंद चव्हाण (वय ५७, रा. पिंपळगाव ता. चाळीसगाव, ) यांच्या राहत्या घरात आरोपी पुतण्या सदानंद हरी चव्हाण रा. पिंपळगाव, साईनाथ मल्लू पवार रा. लवशिंग्या नाशिक, सोबत दोन इसम यांनी डल्ला मारत तब्ब्ल ४ लाखांचा ऐवज चोरून नेला. तसेच फिर्यादीच्या घरात अतिक्रमण करीत राहत असल्याप्रकरणी सुमन गोपीचंद चव्हाण यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली. पीआयसो संजय ठेंगे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. त्यानुसार पुतण्यासह पाच जणांविरुद्द गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सपोनी धर्मसिंग सुंदरडे करीत आहे.