⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

धानोरात महिनाभरापासून गावातील पथदिव्यांची बत्ती गुल!

ग्रामपंचायत प्रशासन कुंभकर्णी झोपेत; ग्रामस्थांमध्ये संताप

जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथील विद्युत देयक थकल्यामुळे वीज वितरण कंपनीने धानोरा गावातील पथदिव्यांचा विद्युत पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस पूर्ण गावात अंधार सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप अनावर झाला आहे. याबाबत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून व वीज वितरण कंपनीसोबत संपर्क करून अधिक माहिती घेतली असता ग्रामपं, ग्राचायतीवर लाखो रुपयांची थकबाकी असल्याने पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला असल्याचे समजले.

पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी भुरट्या चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाली असून पुढे मोठी धाडसी चोरी देखील होऊ शकते अशी भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने पथदिवे तातडीने चालू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. महिलांना सौचालयासाठी जाताना अंधार असल्याने मोठी समस्या निर्माण होत असून
गेल्या महिनाभरापासून गावातील पथदिवे बंद असल्याने महिला वर्गामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

दोन तीन दिवसात सुरू होणार!
गेल्या महिनाभरापासून बंद असलेले पथदिवे येत्या दोन तीन दिवसांत वीजबिल भरून सुरू करण्यात येतील –
विजय चौधरी, उपसरपंच धानोरा