⁠ 
शनिवार, ऑक्टोबर 19, 2024
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | केबल वायर जाळण्याच्या प्रयत्नात दोघे वनीकरणाच्या ताब्यात

केबल वायर जाळण्याच्या प्रयत्नात दोघे वनीकरणाच्या ताब्यात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । धरणगाव शहरालगत असलेल्या वनीकरणमध्ये केबल वायर जाळून तांबे व इतर धातू काढण्याच्या प्रयत्न करीत असलेल्या दोन भामट्यास वन विभागाने ताब्यात घेतले आहे.

मागील काही दिवसापासून धरणगावातील वनीकरणात आग लागण्याच्या घटना घडत होत्या. त्या अनुषंगाने वन अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. रविवारी अचानक धरणगाव वनीकरण गट क्रमांक १२४८ मध्ये अस्लम शेख व मुशर्रफ अली निसार हे दोघे तरुण केबल वायर जाळण्याच्या प्रयत्न करत होते. परंतु, तत्पूर्वीच वन अधिकाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेतले. वनपाल अनिल साळुंखे व वनरक्षक एन. एन. क्षीरसागर यांनी ही कारवाई केली. तर दोघांना ताब्यात घेतले आहे, असे वनपाल अनिल साळुंके यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह