जळगावहुन छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनधारकांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

जून 18, 2024 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२४ । तुम्हीही जळगाव हुन छत्रपती संभाजीनगर जाण्याचा किंवा येण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. जामनेर तालुक्यातील वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील क्र. ७५३ एफ डाव्या बाजुस असलेल्या जुन्या मोठ्या पुलाची परिस्थिती अत्यंत कमकुवत झालेली असून सदर पुल हा पुर्णपणे जिर्ण झालेला आहे.

Add a little bit of body text 11 jpg webp

त्यामुळे सदर पुल वाहतुकीकरिता धोकादायक झालेला असुन या ठिकाणी मोठा अपघात होऊन जीवीत हाणी होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे व जळगाव ते छत्रपती संभाजीनगर या महामार्गाची वाहतुक पुर्णपणे ठप्प होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या पत्रान्वये काढण्यात आलेल्य अधिसुचनेनुसार जामनेर तालुक्यातील मौजे वाकोद या गावातील वाघुर नदीवरील छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या मार्गावरील डाव्या बाजुने असलेला जुना मोठा पुल हा रविवार दि. १६ जून, २०२४ पासून पुलाची दुरुस्ती होई पर्यंत बंद करण्यात येत आहे.

पर्यायी बदल
पर्याय क्र. ०१- जड वाहतुक – नेरी एरंडोल- चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर
पर्याय क्र. ०२ – हलकी वाहतुक – फर्दापुर – तोंडापुर – मांडवा – वाकडी- शहापुर- जामनेर – नेरी
असा बदल करण्यात मंजूरी दिली आहे, असे कार्यकरी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग जालना यांनी कळविले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now