---Advertisement---
बातम्या वाणिज्य

सायबर फ्रॉडच्या घटनांना आळा घालण्यासाठी RBI महत्त्वपूर्ण निर्णय..

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२५ । सध्या डिजिटल ट्रान्सक्शनच्या (Digital Transactions) वाढीसोबत सायबर फ्रॉडचे (Cyber ​​Fraud) प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे, या समस्येला दूर करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, बँका (Bank) आणि इतर नियंत्रित संस्थांना केवळ ‘1600’ नंबर सिरीजचा वापर करून ग्राहकांशी संवाद साधण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामुळे आर्थिक फ्रॉडचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.

rbi jpg webp webp

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) फक्त बँक आणि प्रचारासंबंधित कॉल उचलायला सांगितले आहे. बँकेकडून येणारे कॉलच्या नंबरची सुरुवात १६०० या नंबरपासून सुरु होते. त्यामुळे फक्त तेच नंबर तुम्ही उचला. त्यावरच तुम्हाला अधिकृत माहिती मिळू शकते. इतर नंबर तुम्ही उचलले तर तुमच्यासोबत फ्रॉड होऊ शकतो.

---Advertisement---

याचसोबत जर कोणते मार्केटिंगबाबत फोन कॉल असतील तर त्याची सुरुवात १४० या नंबरने होईल. १४० या नंबरवरुन तुम्हाला मेसेजदेखील येऊ शकतो. हे मार्केटिंगसंबंधित असू शकतात. त्यामुळे फक्त या दोन नंबरवरुन आलेले फोन तुम्ही उचला.

आजकाल सायबर फ्रॉड होण्याच्या संख्येत वाढ होत आहे. सायबर फ्रॉडमुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढू घेतले जातात. त्यामुळे नेहमी सावध राहूनच कोणतेही फोन कॉल उचला. तसेच कोणालाही स्वतः ची माहिती देऊ नका. त्यामुळे तुमचे नुकसान होईल.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---