⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

मंत्री नवाब मलीक यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकलपट्टी करा : भाजपा

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ फेब्रुवारी २०२२ । राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या मंत्रिमंडळासह राष्ट्रवादी पक्षाने मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अश्या मागणीचे निवेदन पाचोरा भाजपातर्फे तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, राज्याचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने बॉम्बस्फोट गुन्हेगारांची संबंधित असल्याच्या संशयावरून अटक केली आहे. त्यांना कोर्टाने 3 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. यापूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा ताबडतोब शरद पवार यांनी घेतला होता, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवाब मलिक यांचा बाबतीत वेगळा निर्णय करत आहे. असे दिसून येत आहे. कुठल्याही राजकीय पक्षाने राजकारण न करता अशा प्रकाराला थारा देण्याची गरज नाही. उलट या कारवाईचे सर्वानी समर्थन करायला हवे, मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीचे जबाब हे कारागृहातून जाऊन घेतलेले आहेत. देशाच्या शत्रुला मदत करणाऱ्यांची गय केली जाऊ नये, मंत्र्यांच्या राजीनामा घेणार नसतील तर राजकारणाचा स्तर खालावेल, देशाच्या शत्रुला मदत करणारे मंत्रिमंडळ देशाला चालणार नाही. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. राष्ट्राच्या अस्मितेचा विषय असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांनी मंत्री नवाब मलिक यांना तात्काळ हकलपट्टी करत मंत्री पदाचा राजीनामा घ्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी राज्यात तीव्र निदर्शने करेल असा इशारा देण्यात आला आहे.

याप्रसंगी सरचिटणीस गोविंद शेलार, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, शहराध्यक्ष समाधान मुळे, नंदूबापू सोमवंशी, सुनील पाटील, किशोर संचेती, योगेश ठाकूर, राहुल गायकवाड, विरेंद्र चौधरी, शुभम पाटील, अक्षय मांडाळे, भावेश पाटील, नितीन भोसले उपस्थित होते.