जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२३ । नवीन वर्षाचे आगमन झाल्यापासून थंडीचा कहर सुरूच आहे. पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतातील मैदानी भागात गोठवणारी थंडी आणि धुके जाणवत आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रात देखील दिसून येतोय. राज्यातील अनेक ठिकाणी थंडीचा काडका वाढला आहे. मात्र यादरम्यान, हवामान खात्याने देशातील 9 राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे तर येणाऱ्या काही दिवसासाठी 7 राज्यांना थंडीच्या लाटेचा रेड अलर्ट दिला आहे.
या राज्यांना पावसाचा इशारा
बिहार, झारखंडच्या काही भागात , मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता असून 6 जानेवारी ते 10 जानेवारीपर्यंत उत्तर भारतात थंडी कायम राहणार आहे. यात हरियाणा, तामिळनाडू, राजस्थानमध्ये थंडीची लाट राहणार आहे. तर दुसरीकडे हिमाचलसह दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, पंजाबमध्ये तापमानात कमालीची घट झाली आहे. यासोबतच या भागात थंडीच्या लाटेचा ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान प्रणालीबद्दल बोलायचे तर, या आठवड्याच्या अखेरीस ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हिमालयीन प्रदेशात बर्फवृष्टी वाढेल. 8 जानेवारीला वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होईल. आंशिक थंड लाटेचा इशारा देण्यात आला आहे. थंडीची लाट कायम राहील तर तापमानात हळूहळू घट दिसून येईल.
पुढील काही तासांत पूर्व भारतातील तापमानात 2 ते 4 टक्क्यांनी घट होण्याची शक्यता आहे. हवामानात विशेष बदल होणार नसला तरी थंड वारे वाहतील. भारतातील गंगेच्या मैदानासाठी स्थानिक पातळीवर अत्यंत तीव्र धुके आणि शीतलहरींचा अंदाज जारी करण्यात आला आहे.
10 जानेवारीपासून पश्चिम हिमालयात आणखी एक वेस्टर्न डिस्टर्बन्स निर्माण होईल. गेल्या 24 तासांत तेलंगणा, तामिळनाडूसह आंध्र प्रदेश, लक्षद्वीप आणि विदर्भात हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानसह झारखंडच्या काही भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हरियाणा, राजस्थान, पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात दाट धुके राहील, थंड लाटेचा इशारा देण्यात आला आहे. बिहार, झारखंड, दिल्ली, हरियाणा, पंजाबसह त्रिपुरा आणि पश्चिम बंगालमध्ये कोल्ड डे अलर्ट जारी करण्यात आला आहे.