⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | चोपडा | पाठलाग करून पकडला अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक

पाठलाग करून पकडला अवैध लाकूड वाहतूक करणारा ट्रक

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ जानेवारी २०२२ । चोपडा येथील सहाय्यक वनसरंक्षकांनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे अडावद येथील वनपाल व कर्मचाऱ्यांनी वाहनाचा पाठलाग करून अवैध लाकूड वाहतुक करणारा ट्रक ममुराबाद येथे पकडला. मात्र, वनपालांनी लाकूड तस्करांना अभय देत हा ट्रक सोडून दिल्याने वृक्ष प्रेमींकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

अडावद ते धानोरा रस्त्यावर २२ रोजी सकाळी ट्रक (एमएच- ०४, सीए- १३१७) मधून विना परवाना भोकर व उंबराचे लाकूड वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली हाेती. या संदर्भात चोपडा येथील सहाय्यक वनसंरक्षक यांच्या आदेशावरून सापळा रचला. अडावदचे वनपाल के.आर.सूर्यवंशी, उनपदेव येथील वनरक्षक एच. बी. सोनवणे, वर्डी येथील वनरक्षक आर.ए.भुतेकर व वन कर्मचाऱ्यांनी हे वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रक चालकाने वाहन घेवून धूम ठाेकली. त्यानंतर वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला असता हा ट्रक ममुराबाद येथे रस्त्याच्या कडेला आढळून आला. या प्रकरणी वन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात उंबर, भोकरचे १ हजार ७०८ रुपयांचे अंदाजे २.००० घन मीटर लाकूड व १ लाखांचा ट्रक जप्त केला आहे. संशयित ट्रक चालक इरफानोद्दिन रफियोद्दीन यांच्यावर गुन्हा दाखल केला. दरम्यान, वनपाल सूर्यवंशींनी तस्करांना सोडून ट्रक चालकास पकडले. उडवाउडवीचे उत्तर देऊन लाकूड तस्करांना नेहमी अभय दिला जात असल्याने वृक्षप्रेमी नाराज आहेत.

दरम्यान, लाकडाचा ट्रक पकडला असून हा मुद्देमाल चोपडा येथील विक्री आगारात जमा केला आहे. परंतु, या प्रकरणात अद्यापर्यंत चौकशी सुरू आहे. लाकूड कुणाच्या शेतातील आहे की, जंगलातील याचा तपास केला जात असल्याचे अडावद येथील वनपाल के.आर.सूर्यवंशी यांनी सांगितले.

हे देखील वाचा :

author avatar
टीम जळगाव लाईव्ह