एअरपोर्टमध्ये 10वी,12वी पास तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी; 1446 पदांसाठी भरती

सप्टेंबर 17, 2025 10:44 AM

एअरपोर्टवर काम करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.आयजीआय एव्हिएशन सर्व्हिसेसकडून विविध पदांसाठी मोठी पदभरती सुरु आहे. एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ आणि लोडर पदासाठी ही भरती होत असून १४०० पेक्षा जास्त पदांसाठी ही भरती केली जात आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

IGI Aviation

जर तुम्हीही या नोकरीसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला igiaviationdelhi.com या वेबसाइटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. १०वी,१२वी पास तरुण या नोकरीसाठी अर्ज करु शकतात. फ्रेशर्स तरुणांसाठी नोकरीची ही उत्तम संधी आहे. जर एकाच उमेदवाराला दोन्ही पदांसाठी अर्ज करायचा असेल तरीही ते करु शकतात.अर्ज करण्याची अंतिम तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे.

रिक्त पदांचा तपशील :

या भरती मोहिमेत एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी १०१७ जागा रिक्त आहेत.
लोडर पदासाठी ४२९ जागा रिक्त आहेत.
आयजीआय एविएशन सर्विसेज पदासाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात.

भरतीसाठी पात्रता

एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. एअरपोर्ट लोडर पदासाठी १०वी पास असणे अनिवार्य आहे. याचसोबत आयटीआय करणारे विद्यार्थीदेखील ग्राउंड स्टाफ पदासाठी अर्ज करु शकतात.

एअरपोर्ट ग्राउंड स्टाफ पदासाठी निवड झाल्यावर उमेदवारांना विमानतळावर चेक इन, एअरलाइन तिकिट आरक्षण, बोर्डिंग आणि टर्मिनलसंबंधित कामे करावी लागणार आहेत. एअरपोर्ट लोडर पदासाठी विमान आणि ट्रॉलिचे काम, कार्गोसंबंधित कामे करावी लागणार आहेत.

किती पगार मिळणार?

या नोकरीसाठी ग्राउंड स्टाफ पदासाठी २५००० ते ३५००० रुपये पगार मिळणार आहे. लोडर पदासाठी १५००० ते २५००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि इंटरव्ह्यूद्वारे होणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०२५ आहे. त्यामुळे इच्छुकांनी अर्ज करावेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now