भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 10वी पाससाठी संधी; तब्बल 1010 जागांसाठी भरती

जुलै 16, 2025 11:55 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. जर तुम्हीही यापैकी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये मोठी पदभरती निघाली आहे. विशेष १० वी पास आणि आयटीआय झालेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे. ICF Recruitment 2025

ICF Bharti

रेल्वे ICF ने अप्रेंटिस पदासाठी ही भरती जाहीर केलीय. या भरतीद्वारे तब्बल १०१० जागा भरल्या जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया देखील सुरु झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. तुम्ही pb.icf.gov.in या वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ ऑगस्ट २०२५ आहे ICF Bharti 2025

पदाचा तपशील :

या भरती मोहिमेत कारपेंटर, इलेक्ट्रिशियन, फिटर, मशीनिस्ट, पेंटर, वेल्डर, मेडिकल लॅब टेक्निशियन अशा पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता : रेल्वेमधील अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने दहावी आणि सायन्स स्ट्रीममधून १२वी पास असणे गरजेचे आहे. तसेच ITI संबंधित ट्रेडमध्ये ITI सर्टिफिकेट प्राप्त केलेले असावे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज कराराच्या उमेदवाराचे वय १५ ते २२ असावे. या नोकरीसाठी पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असणार आहे. त्यामुळे तुम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन याबाबत माहिती मिळवा.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

स्टायपेंड : या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ट्रेनिंगच्या काळात स्टायपेंड दिली जाईल. १०वी पास तरुणांनी ६००० रुपये प्रति महिना स्टायपेंड मिळणार आहे. तर १२वी पास आणि आयटीआय सर्टिफिकेट प्राप्त उमेदवारांना ७००० रुपये मिळणार आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now