बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

पदवी उत्तीर्णांना सरकारी बँकांमध्ये नोकरी मिळविण्याची संधी!! तब्बल 3049 जागांवर भरती

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकांमध्ये भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक खुशखबर आहे. PO भरतीसाठीची अधिसूचना इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन म्हणजेच IBPS द्वारे जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 3049 जागा भरल्या जातील. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2023 आहे. IBPS PO Bharti 2023

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
आवश्यक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: अर्ज करणाऱ्यांचे वय 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
अर्ज शुल्क : अर्ज करणाऱ्या जनरल आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 850 रुपये परीक्षा फी भरावी लागेल. तसेच SC/ST/PWD प्रवर्गातील उमेदवारांना 175 रुपये अर्ज शुल्क लागेल.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023
याप्रमाणे अर्ज करा
या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी प्रथम ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
वेबसाइटच्या होम पेजवर CRP PO MT च्या लिंकवर क्लिक करा.
यानंतर, IBPS प्रोबेशनरी ऑफिसर / मॅनेजमेंट ट्रेनी 13 वी भर्ती 2023 च्या लिंकला भेट द्यावी लागेल.
पुढील पृष्ठावर मागितलेल्या तपशीलापूर्वी नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर, तुम्ही अर्ज भरू शकता.
अर्ज केल्यानंतर प्रिंट घ्या.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online