तरुणांसाठी खुशखबर ! सरकारी बँकामध्ये तब्बल 10277 जागांसाठी मेगाभरती सुरु, पगार 64480

ऑगस्ट 1, 2025 2:09 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । तुम्हीही पदवी पास असाल आणि बँकेत नोकरीचे स्वप्न पाहत असाल तर तुमच्यासाठी गुडन्यूज आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) ने क्लर्क भरतीची जाहिरात प्रसिद्ध केलीय. या भरती प्रक्रियेद्वारे तब्बल १०२७७ रिक्त जागा भरल्या जाणार आहे. विविध सरकारी बँकांमध्ये ही पदे भरली जाणार आहे. IBPS Clerk Bharti 2025

IBPS Clerk Bharti

त्यानुसार बँकेत काम करू इच्छिणारे उमेदवार आता IBPS ibps.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन क्लर्क या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ ऑगस्ट २०२५ निश्चित करण्यात आली आहे. IBPS Clerk Recruitment 2025

भरतीसाठी आवश्यक पात्रता

क्लर्क पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी भारतातील मान्यताप्राप्त संस्थेतून कोणत्याही विषयात पदवी पास असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवारांचे किमान वय २० वर्षे आणि कमाल वय २८ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. तसेच, विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयात सूट देखील दिली जाईल. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयात ५ वर्षे, ओबीसी उमेदवारांना ३ वर्षे आणि अपंग उमेदवारांना १० वर्षे वयोमर्यादेत सूट दिली जाईल.

किती परीक्षा शुल्क लागेल?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क १७५ रुपये आहे आणि इतर श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५० रुपये आहे.

किती पगार मिळेल?

बेसिक – 24050-1340/3-28070-1650/3-33020-2000/4-41020-2340/7-57400- 4400/1-61800-2680/1-64480/- रुपये पगार मिळेल

फॉर्म कसा भरायचा

आयबीपीएस क्लर्क पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना खालील चरणांचे अनुसरण करावे लागेल.
फॉर्म भरण्यासाठी, प्रथम आयबीपीएस ibps.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
यानंतर, वेबसाइटच्या होम पेजवरील आयबीपीएस अर्ज लिंकवर क्लिक करा.
आता विहित प्रमाणपत्रे प्रविष्ट करा.
स्कॅन केलेले कागदपत्रे, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
आता सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर, त्याची प्रिंटआउट घ्या.

भरतीची जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लीक करा

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now