⁠ 
रविवार, सप्टेंबर 8, 2024
Home | नोकरी संधी | पदवी पास आहात का? तब्बल 6000+जागांसाठी निघाली महाभरती; पगार 47000 पर्यंत मिळेल..

पदवी पास आहात का? तब्बल 6000+जागांसाठी निघाली महाभरती; पगार 47000 पर्यंत मिळेल..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. इंस्टीट्यूट ऑफ बैंकिंग पर्सनेल म्हणजेच IBPS ने लिपिक पदांसाठी महाभरती जाहीर केली आहे. ग्रॅज्युएट्स पास उमेदवारांना ही सर्वात मोठी संधी आहे. या भरतीद्वारे एकूण 6128 जागा भरल्या जातील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता ऑनलाईन पद्धतीने त्वरित अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2024 आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
(i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.
वयाची अट : वय 01 जुलै 2024 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

किती अर्ज फी लागेल?
सर्व उमेदवारांसाठी अर्जाची फी 850 रुपये आहे, SC, ST, PWBD, ESM आणि DESM सारख्या राखीव प्रवर्गांसाठी 175 रुपये शुल्क आहे.
तुम्हाला मिळेल इतका पगार :
IBPS लिपिकाचे मूळ वेतन दरमहा 19,900 ते 47920 रुपये आहे.सोबत वेतनामध्ये महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वैद्यकीय भत्ता आणि वाहतूक भत्ता यांचा समावेश होतो. सुरुवातीला सामील झालेल्यांसाठी IBPS लिपिक पगाराशी संबंधित रोख रक्कम रु. 29453 आहे.

परीक्षेच्या तारखा :
PET: 12 ते 17 ऑगस्ट 2024
पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2024
मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2024

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.