सोमवार, डिसेंबर 4, 2023

जे गेले त्यांच्या भवितव्याची चिंता – शरद पवार

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । पक्षावर कोणीही कितीही दावा केला तरी मला फरक पडत नाही. मी लोकांपुढे जाऊन माझे विचार मांडले आणि लोक मला साथ देतील याचा मला विश्वास आहे अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी अजित पवार यांच्या बंडावर दिली. याचबरोबर मला जे गेले त्यांच्या भवितव्याची चींता आहे.असे हि शरद पवार म्हणाले.

पक्षाच्या विरोधातली भूमिका काही लोकांनी मांडली आहे. त्यांच्यावर काय कारवाई करायची हे येत्या काही दिवसात आमच्या नेत्यांशी बोलून घेवू. मात्र जॆ जे पक्षाचा विरोधातली भूमिका घेईल त्यावर कारवाई करण्यात येईल असेही शरद पवार म्हणाले.

हा प्रश्न काही आमच्या घरातला नाही. हा प्रश्न जनतेसमोर मांडलेल्या भूमिकेचा आहे. असेही यावेळी शरद पवार म्हणाले. यानंतर उद्या मी कराडला जाऊन यशवंतराव चव्हाण यांचे दर्शन घेणार आहे आणि कामाला लागणार आहे असेही शरद पवार म्हणाले.

राष्ट्रवादी पक्षासोबत जी घटना आज घडली आहे. ती घटना माझ्यासाठी काही नवीन नाही. 1980 झाली माझ्यासोबत अशीच एक घटना घडली होती. आणि माझ्या विरोधातल्या कित्येक आमदारांना येत्या निवडणुकीत जनतेने पराभूत केलं होतं. असेही यावेळी शरद पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार केलेली लोक असलेल्या दावा केला होता. आज राष्ट्रवादीसोबत त्यांनी एकत्र शपथ घेऊन आम्ही कोणताही भ्रष्टाचार केला नाही. याची पावती दिली आहे. असेही शरद पवार म्हणाले.