जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । लवंड्यांबद्दल मी फार बोलणार नाही अश्या शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या टीकेला महत्व न देता राऊतांवर टीका केली. यावेळी पुण्यात ते पत्रकारांशी बोलत होते.
संजय राऊत यांनी राज ठाकरेंना, ‘नवहिंदू ओवैसी’ आणि मनसेला ‘नवहिंदुत्ववादी एमआयएम’ म्हटलं आहे. दरम्यान संजय राऊतांच्या या टीकेला राज ठाकरेंनी उत्तर न देता उत्तर दिल.
“मला दोन घोषणा करायच्या होत्या. ते बोलले की आम्ही बोलायचं तेव्हा आम्ही बोलायचं हे काही योग्य नाही. योग्य वेळ येईल तेव्हा मी बोलेन. लोकांना भोंग्याचा धार्मिक विषय आहे असं वाटत आहे, पण हा धार्मिक नसून सामाजिक विषय आहे. त्याच्याकडे त्याच अंगाने पाहण्याची गरज आहे,” असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं