---Advertisement---
महाराष्ट्र राजकारण

सटरफटर लोकांमुळे मला नाराज होण्याचे कारण नव्हते – निलम गोऱ्हे

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२२ । उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे गटाला एक मोठा धक्का बसला आहे. कारण ठाकरेंच्या निष्ठावंत आसलेल्या व विधान परिषदेच्या उपसभापती आणी ठाकरे गटाच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. य़ावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते.

nilam gorhe jpg webp webp

निलम गोऱ्हे यांची ओळख म्हणजे महिलांच्या प्रश्नांवर व सामाजिक प्रश्नांवर आवाज उठवणारा स्वच्छ चेहरा. त्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू होत्या. वर्षभरापासुन त्या शिंदें विरोधात आक्रमकपणे प्रचार करत आहेत.अश्या वेळी हा उद्धव ठाकरे यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

---Advertisement---

गोऱ्हे या शिवसेनेत प्रवेश करताना म्हणाल्या की, केंद्रातील नरेंद्र मोदी आणि राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारवर माझा विश्वास आहे. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सटरफटर लोकांमुळे मला नाराज होण्याचे कारण नव्हते. हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याने आपण शिवसेनेत प्रवेश केला असा टोला शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गोऱ्हे यांनी सुषमा अंधारे यांना लगावला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---