जळगाव लाईव्ह न्यूज । ६ जुन २०२३ । राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनी भाजप नेते मंत्री गिरिश महाजन यांच्यावर पुन्हा टिका केली आहे. या वेळी आमदार एकनाथ खडसे म्हणाले कि, गिरीश भाऊंना आम्ही मदत केली नसती तर त्यांना वडिलांच्या पेन्शवरच जगावे लागले असते. तुमच्या नावावर करोडो रुपयांची मालमत्ता आली कुठून? माझ्या मुलीच्या लग्नात गिरीश भाऊंना मुलीचा बाप म्हणून मी कन्यादान करण्याचा अधिकार दिला होता. पण ज्या मुलीचे कन्यादान केले त्याच जावयाला तुरुंगात टाकण्याचे पाप या लोकांनी केलं आहे.
पुढे बोलताना खडसे यांनी म्हटलं की, भोसरीची जमीन माझी नाही मी जमीन घेतलेली नाही. जमीन घेणे हे चुकीचे आहे काय ? जी जमीन घेतली तिची रितसर खरेदी केली आहे. ज्या दिवशी खरेदी झाली त्या दिवशी सात बारावर एमआयडीसीचे नाव नव्हते, मूळ मालकाचे नाव होते. तो व्यवहार महसुली होता.
पुढे बोलताना खडसे यांनी म्हटलं की, माझे वडिल जमिनदार होते. १९५० चे उतारे काढा बघा त्यावर नाव कोणाचे आहे. आम्ही जमीनदाराची पोरं आहोत. त्यामुळे दोन चार कोटी रुपये असणे ही मोठी बाब नाही.माझी फॅमिली सुशिक्षित आहे, डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि ठेकेदार पूर्वीपासूनच आहेत. तुमच्या नावावर करोडो रुपयांची मालमत्ता आली कुठून ? मुंबई, जळगाव ,जामनेर येथे भव्य फ्लॅट ही मालमत्ता आली कुठून ? तुम्ही जे व्यवहार केले ते शुद्ध आणि नाथाभाऊंच्या जावयाने व्यवहार केले ते अशुद्ध कसे?’