जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । यावल तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय विवाहितेचा शक्क तिच्या चुलत दिराकडून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडीच आली आहे. या प्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल असून संशयित दिराला फैजपूर पोलिसांनी अटक केली आहे.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील २४ वर्षीय विवाहिता ह्या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करते. ७ एप्रिल रोजी दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या दरम्यान विवाहिता घरी असताना तिचा चुलत मानलेला दिर याने तिच्या बेडरूममध्ये येवून मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबाबत विवाहितेने फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली असून त्यांच्या तक्रारीवरून येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर दीराला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सोनवणे करीत आहे.












