⁠ 
गुरूवार, एप्रिल 18, 2024

मुकेश अंबानींच्या झेड प्लस सुरक्षेवर किती खर्च होतो? ‘हा’ आकडा वाचून व्हाल चकित

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ । रिलायन्स उद्योग समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे जगातील श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहे. ते प्रसिद्ध उद्योगपती देखील आहे. त्यांचा उल्लेख होताच डोळ्यांसमोर पैसाच पैसा येतो. नवनवे बिझनेस सुरु करून त्यांची संपत्ती इतकी वाढली आहे की, आपण केवळ विचार करून चक्रावून जाऊ. काही सेकंदात ते लाखो रूपये कमावतात. आता ज्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे म्हटलं कि त्यांच्या सुरक्षेची व्यवस्थाही मजबूत असली पाहिजे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या संरक्षणासाठी किती खर्च येतो, आणि कशी सुरक्षा पुरवली जाते हे आज आपण पाहणार आहोत.

मुकेश अंबानी देशातले एकमेव असे उद्योगपती आहेत ज्यांना Z plus Security मिळते. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसंच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांसारख्या नेत्यांना जी Z plus Security आहे ती सुरक्षा मुकेश अंबानी यांना आहे. तसंच मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी यांना Y कॅटेगरीची सुरक्षा मिळते.

NSG आणि SPG कमांडोसोबत 55 सुरक्षारक्षक
मुकेश अंबानी यांना Z plus Security असल्याने त्यांच्या सुरक्षेला 55 सुरक्षारक्षक असतात. या सुरक्षा रक्षकांमध्ये NSG आणि SPG कमांडो असतात. या दोन्ही ग्रुपचे कमांडो विशेष प्रशिक्षित असतात. याशिवाय ITBP और CRPF जवान देखील सुरक्षेसाठी तैनात असतात.

वृत्तानुसार, मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी 25 CRPF कमांडो 24 तास तैनात असतात. हे सैनिक जर्मनने बनवलेल्या Heckler & Koch MP5 सब-मशीन गनसह अनेक आधुनिक शस्त्रांनी सज्ज राहतात. या बंदुकीतून एका मिनिटात 800 गोळ्या झाडल्या जाऊ शकतात. सशस्त्र रक्षकांव्यतिरिक्त, अंबानींच्या सुरक्षेखाली तैनात असलेल्या CRPF कमांडो दलात रक्षक, चालक, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी आणि त्यांच्यासोबत असलेले शोध पथक यांचा समावेश आहे.

अंबानींच्या सुरक्षेत तैनात असलेले हे कमांडो दोन शिफ्टमध्ये काम करतात. सीआरपीएफचे जवान अंबानींच्या घराभोवती संशयास्पद हालचाली आणि लोकांवरही नजर ठेवतात. अंबानींच्या घराभोवती सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याच वेळी, सशस्त्र सैनिक इमारतीच्या आत आणि घराच्या गेटशिवाय वाहनांजवळ तैनात असतात.CRPF व्यतिरिक्त मुकेश अंबानी यांच्याकडे 15-20 वैयक्तिक सुरक्षा रक्षक आहेत, जे त्यांच्यासोबत शस्त्रास्त्रांशिवाय राहतात.

मुकेश अंबानी बुलेटप्रूफ बीएमडब्ल्यू किंवा मर्सिडीज कारमध्ये गाडी चालवतात. त्याचवेळी त्यांचे सुरक्षा रक्षक रेंज रोव्हरमध्ये फिरतात. त्यांच्या ताफ्यात सीआरपीएफ आणि खासगी सुरक्षा रक्षकांची 6 ते 8 वाहने धावतात. यातील निम्मी वाहने अंबानींच्या गाडीच्या पुढे धावतात आणि बाकीची त्यांच्या गाडीच्या मागे.

सुरक्षारक्षकांवर किती खर्च येतो?
आता अंबानी यांच्या सुरक्षारक्षकांवर होणार खर्च किती असेल असा प्रश्न तुम्हाला पडत असेल. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला मिळालेल्या Z+ सुरक्षेची किंमत दरमहा १५-२० लाख रुपये आहे. हा सर्व खर्च अंबानी स्वतः उचलतात. तसे, बहुतेक प्रकरणांमध्ये, Z+ सुरक्षेचा खर्च सरकार उचलतो. या खर्चामध्ये त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या सैनिकांचे पगार आणि सुरक्षेत तैनात असलेल्या वाहनांच्या खर्चाचा समावेश आहे. अंबानी आणि त्यांच्या कुटुंबाला प्रदान करण्यात आलेल्या Z+ सुरक्षेव्यतिरिक्त, त्यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जामनगर रिफायनरीची सुरक्षा CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल म्हणजे) च्या हातात आहे. रिपोर्ट्सनुसार, यासाठी रिलायन्स सीआयएसएफला दरमहा ३४ लाख रुपये देते.