राज्यातील या भागात आज मुसळधार ; जळगावात कसा आहे पावसाचा अंदाज??

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जुलै २०२३ । राज्यात जून महिन्यात ओढ दिलेल्या मान्सून पावसाने मात्र जुलै महिन्यात जोरदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक भागात अद्यापही पावसाचा जोर कायम असून अशातच आज राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्हे वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यातील 4 जिल्ह्यांना आज (26 जुलै) रेड अलर्ट दिला आहे. तसेच उर्वरित जिल्ह्यांना ऑरेन्ज आणि यलो अलर्टही दिला गेला आहे.  त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. दरम्यान, आज जळगाव जिल्ह्यात देखील पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

या जिल्ह्याला रेड अलर्ट
आयएमडीनुसार, कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रत्येकी 2 असे एकूण 4 जिल्ह्यांना रेड अलर्ट आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सातारा आणि पुणे या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला गेला आहे. त्यामुळे या 4 जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.

कोणत्या जिल्ह्यांना ऑरेन्ज अलर्ट?
तसेच मुंबई, ठाणे, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना हवामान खात्याने ऑरेन्ज अलर्ट दिलाय. त्यामुळे या 4 जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

या जिल्ह्यांना येलो अलर्ट :
मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसेल.

जळगावला येलो अलर्ट जारी
दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील मागील तीन चार दिवसापासून सायंकाळी ढग दाटून येत असून काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. तर दिवसभरात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. काल रात्र ८ नंतर जिल्ह्यातील अनेक्क ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. आज जळगाव जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला असून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा / 26 जुलै
बोदवड-21
भडगाव-17
भुसावळ-2.6
पाचोरा-34
जामनेर-22
चाळीसगाव-15
रावेर-13
मुक्ताईनगर-6
धरणगाव-30
यावल-6
एरंडोल-12
जळगाव-9