---Advertisement---
गुन्हे जळगाव जिल्हा रावेर

एकाच रात्री एकाच भागात पाच ठिकाणी घर फोडी

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ जून २०२३ । शहरात मंगळवारी रात्री एकाच भागात पाच ठिकाणी बंद घर फोडून घर फोडण्यात आले. यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड खळबळ पसरली.. पाचही घरफोड्यांमध्ये सुमारे 17 हजारांचा ऐवज लांबवण्यात आला. पोलीस उपअधीक्षक डॉ.कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी भेट देवून पाहणी केली.

crime 11 jpg webp


रावेर शहरातील सावदा रोडवरील अष्टविनायक नगरात मंगळवारी रात्री पाच ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या. बंद घराचे कुलूप तोडून या घरफोड्या करण्यात आल्या. त्यातील एका घरातून 10 हजार रुपये रोख व सात हजाराचे चांदीचे लहान मुलांचे दागिने असा 17 हजारांचा ऐवज लंपास करण्यात आला.

---Advertisement---

एकाच भागात झालेल्या पाच घरफोड्यांमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रमेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---