---Advertisement---
जळगाव जिल्हा भुसावळ

खुशखबर! होळीसाठी जळगाव, भुसावळ मार्गे धावणार पुणे-मुंबईसाठी विशेष ट्रेन; जाणून घ्या ट्रेनचं वेळापत्रक

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ फेब्रुवारी २०२५ । पुढील महिन्यात म्हणजेच मार्च महिन्यात होळीचा (Holi) सण आहे. आणि या होळीला गावी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. मात्र, ट्रेनने गावी जाताना या प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. त्यामुळे प्रवाशांची होणारी ही गैरसोय दूर करण्यासाठी मध्य रेल्वेने पुढाकार घेतला आहे. रेल्वेने होळीसाठी विशेष ट्रेनची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे या रेल्वेगाड्या जळगाव भुसावळ मार्गे धावणार असल्याने जळगावकर प्रवाशांची सोय होणार आहे. या ट्रेन मुंबई-नागपूर आणि नागपूर ते पुणे अशा धावतील. या विशेष ट्रेनचं वेळापत्रक जाणून घेऊया… Holi Special Train News

सीएसएमटी-नागपूर-सीएसएमटी साप्ताहिक विशेष ट्रेन (८ फेऱ्या)
०२१३९ या नंबरची साप्ताहिक विशेष ट्रेन ९ मार्च , ११ मार्च, १६ मार्च आणि १८ मार्च रोजी धावेल. त्याच दिवशी दुपारी ३. १० वाजता नागपूरला पोहचेल. परतीच्या प्रवासात गाडी नंबर ०२१४० ही नागपूरहून ९ मार्च, ११ मार्च, १६ मार्च, १८ मार्चला रात्री ८ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता सीएसएमटी रेल्वे स्थानकावर पोहचेल.
थांबे :- दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन नंबर ०१४६९ साप्ताहिक विशेष ११ मार्च आणि १८ मार्च रोजी पुण्याहून दुपारी ३.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहचेल. ट्रेन नंबर ०१४७० ही साप्ताहिक विशेष गाडी १२ मार्च आणि १९ मार्च रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११. ३० वाजता पुण्यात पोहचेल.

पुणे-नागपूर-पुणे साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
ट्रेन नंबर ०१४६७ विशेष १२ मार्च आणि १९ मार्च रोजी पुण्याहून दुपारी ३.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला पोहोचेल. ट्रेन नंबर ०१४६८ विशेष गाडी १३ मार्च आणि २० मार्च रोजी सकाळी ८ वाजता नागपूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पुण्यात पोहोचेल
थांबे :- ०१४६९/०१४७० आणि ०१४६७/०१४६८ साठी थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा

सीएसएमटी-मडगाव सीएसएमटी साप्ताहिक विशेष ट्रेन (४ फेऱ्या)
०११५१ साप्ताहिक विशेष ट्रेन सीएसएमटी रेल्वे स्थानकावरून ६ मार्च आणि १३ मार्च रात्री १२. २० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता मडगावला पोहचेल. त्या बदल्यात, ०११५२ साप्ताहिक विशेष ट्रेन ६ आणि १३ मार्च रोजी दुपारी २.१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटी स्थानकात पोहचेल.
थांबे :- दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलावले, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम

एलटीटी-मडगाव-एलटीटी साप्ताहिक विशेष ट्रेन (४ फेऱ्या)
०११२९ ही ट्रेन एलटीटीहून १३ मार्च आणि २० मार्च रोजी रात्री १०. १५ वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.३० वाजता मडगावला पोहचेल. परतीच्या प्रवासाबद्दल सांगायचे झाले तर, ट्रेन नंबर ०११३० ही साप्ताहिक विशेष ट्रेन १४ मार्च आणि २१ मार्च रोजी मडगावहून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ४.०५ वाजता एलटीटीला पोहचेल.
थांबे :- ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण. संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

एलटीटी-हजूर साहिब नांदेड-एलटीटी साप्ताहिक विशेष (४ फेऱ्या)
ही ट्रेन ०११०५ साप्ताहिक विशेष १२ मार्च आणि १९ मार्च रोजी एलटीटीहून दुपारी १२.५५ वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री नऊ वाजता नांडेलला पोहचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन नंबर ०११०६ साप्ताहिक विशेष नांदेडहून १२ मार्च आणि १९ मार्च रोजी रात्री १०. ३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुपारी ४.०५ वाजता एलटीटीला पोहचेल.
थांबे :- ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्दुवाडी, बरसी टाउन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परली, गंगाखेर, परभणी आणि पूर्णा.

बुकिंग कधी सुरू होईल?
०२१३९/०२१४०, ०११५१/०११५२, ०११२९/०११३०, ०४१६९/०४१७०, ०१४६७/०१४६८, आणि ०११०५ या विशेष गाड्यांसाठी बुकिंग २४ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होईल. www.irctc.co.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तिकिट आरक्षित करू शकता.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment