---Advertisement---
कोरोना बातम्या महाराष्ट्र

चीनमधील HMPV व्हायरसची महाराष्ट्रात एन्ट्री; नागपुरात दोन रुग्ण आढळले, राज्य सरकार अलर्टवर

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जानेवारी २०२५ । कोरोनानंतर आता चीनमध्ये HMPV नावाच्या व्हायरसने धुमाकूळ घातला असून यामुळे जगाचं पुन्हा टेन्शन वाढलं आहे. एचएमपीव्ही व्हायरसच्या बातमीने लोकांच्या कोरोना (Corona) महामारीच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. दरम्यान चीनमधील HMPV व्हायरसचे रुग्ण भारतातही आढळून आले असून आता तो महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकला. नागपूरमध्ये (Nagpur) HMPV या विषाणूचे दोन संशयीत रूग्ण आढळले आहे. राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे.

HMPV 2

गुजरातच्या अहमदाबादमध्ये दोन महिन्यांच्या बाळाला HMPV व्हायरसची लागण झाल्यानंतर कर्नाटकातही 3 महिन्यांची मुलगी आणि 8 महिन्यांच्या मुलाला या व्हायरसने बाधा झाल्याचे निदान झालं होतं. अशातच आता नागपुरातही एचएमपीव्ही व्हायरसचे 2 संशयित रुग्ण आढळले आहेत.

---Advertisement---

नागपुरात दोन लहान मुलांचा रिपोर्ट एचएमपीव्ही पॉझिटिव्ह आल्याच खासगी रुग्णलायांतून सांगितलं जातं आहे. यामध्ये सात वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खासगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आल्याचे समोर आलेय. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही मुलं सध्या ठणठणीत बरी झालेली आहेत. पण जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल, असे समोर आलेय.

या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता. दोन्ही मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची गरज पडली नाही. दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याचीही माहिती. खाजगी रुग्णालयातून हे रिपोर्ट घेण्यात आले आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात शासकीय लॅबमधून याची जीनोम सिक्वेन्सींग केली जाईल. त्यानंतरच हे रुग्ण HMPV असल्याचं स्पष्ट होईल, असे सांगण्यात येत आहे. HMPV मुळे होणारी गुंतागुंत कोरोनाव्हायरस सारखीच आहे, ज्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

नवा नाही हा व्हायरस
चीनमध्ये संसर्ग वाढल्यापासून हा व्हायरस फार चर्चेत आहे. 2001 मध्ये याची प्रथम ओळख झाली. जगभरात या संसर्गजन्य प्रकरणं वेळोवेळी नोंदवण्यात आली आहेत. या व्हायरसची ओळख पटल्यानंतर दोन दशकांनंतरही यावर लस विकसित केली गेली नाहीये. शिवाय यावर कोणताही विशिष्ट उपचार नाहीये. एचएमपीव्हीची कोणतीही लस नसल्यामुळे आता मात्र हा जागतिक स्तरावर हा श्वसनाच्या गंभीर आजाराचं कारण बनू शकतो.

व्हायरसचा धोका टाळण्यासाठी हे करा
जेव्हा आपल्याला खोकला किंवा शिंका येत असेल तेव्हा आपले तोंड आणि नाक रुमाल किंवा टिश्यू पेपरने झाका.
साबण आणि पाणी किंवा अल्कोहोल आधारित सॅनिटायझरने आपले हात वारंवार धुवा.
ताप, खोकला आणि शिंका येत असल्यास सार्वजनिक ठिकाणांपासून दूर राहा.
भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक खा

या गोष्टी करू नका
हस्तांदोलन
टिश्यू पेपर आणि रुमालाचा पुनर्वापर
आजारी लोकांशी जवळचा संपर्क
डोळे, नाक आणि तोंडाला वारंवार स्पर्श करणं.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणं
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध (सेल्फ मेडिकेशन) घेणं.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---