---Advertisement---
आरोग्य बातम्या राष्ट्रीय

सावधान! चीनमध्ये पसरणारा HMPV व्हायरस भारतात पोहोचला? या शहरात 8 महिन्यांच्या मुलीला लागण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जानेवारी २०२५ । कोविड-19 नंतर आता चीनमध्ये आणखी एक व्हायरस वेगाने पसरत आहे. HMPV नावाच्या या व्हायरसने चीनमध्ये अनेकांना संक्रमित केले आहे आणि आता या एचएमपीव्ही व्हायरसने भारतातही दार ठोठावले आहे. हा व्हायरस भारतात पोहोचला असून त्याचा पहिला रूग्ण बेंगळुरूमध्ये नोंदवण्यात आढळला असल्याची माहिती आहे. एका आठ महिन्यांच्या मुलीला याची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे HMPV Virus

HMPV Viral

बंगळुरू मधील रुग्णालयात एका आठ महिन्यांच्या मुलीमध्ये HMPV च्या व्हायरसची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. दरम्यान आरोग्य मंत्रालयाच्या सांगण्यानुसार, त्यांच्या लॅबमध्ये याची चाचणी केली गेली नाही. या प्रकरणाचा रिपोर्ट एका खासगी रुग्णालयात करण्यात आला आहे.

---Advertisement---

मुलांना या विषाणूची सर्वाधिक लागण
चीनमध्ये पसरणाऱ्या एचएमपीव्ही विषाणूमुळे लहान मुलांना सर्वात जास्त संसर्ग होतो. माहितीनुसार. सर्व फ्लू नमुन्यांपैकी 0.7 टक्के एचएमपीव्हीचा वाटा आहे.

या व्हायरसची लक्षणं काय आहेत?
या व्हायरसला मेटाप्युमोव्हायरस किंवा एचएमपीव्ही असं म्हटलं जातं. ज्याची लक्षणे सामान्य सर्दीसारखी असतात. सामान्य प्रकरणांमध्ये यामुळे खोकला, नाक वाहणं किंवा घसा खवखवणं यांसारखी लक्षणं दिसून येतात. एचएमपीव्ही संसर्ग लहान मुलं आणि वृद्धांमध्ये गंभीर असू शकतो. या व्हायरसमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असलेल्या लोकांमध्ये गंभीर आजार होऊ शकतो.

HMPV नवा व्हायरस नाही
यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, HMPV हा नवीन व्हायरस नसल्याचं सांगितलं आहे. हा व्हायरस पहिल्यांदा 2001 मध्ये आढळून आला होता. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, काही सेरोलॉजिकल पुराव्यांवरून असं दिसून आलं आहे की, हा व्हायरस 1958 पासून आहे.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---