⁠ 
शनिवार, जानेवारी 11, 2025
Home | जळगाव जिल्हा | धरणगाव | धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात

धरणगावच्या गुड शेपर्ड स्कुलमध्ये हिंदी दिवस उत्साहात

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १४ सप्टेंबर २०२२ । धरणगाव येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये आज १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ५ वी ते १० वी च्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी हिंदी भाषा, भाषेचे साहित्य, भाषेची समृद्धी याविषयी विविध काव्यरचना तसेच मनोगत व्यक्त करून माहिती दिली.

तसेच १० वी ची विद्यार्थिनी मनस्वी पाटील हिने आपल्या प्रास्ताविकपर मनोगतातून हिंदी दिवस का साजरा केला जातो याविषयी माहिती दिली. यात १० वी ची श्रेया भावे, मनस्वी पवार, कृपा पांडे, ९ वी चा कुणाल चव्हाण, ८ वी चे हर्षल पाटील, रोहन पवार, अथर्व पांडे, नक्षत्रा पाटील, ५ वी ची जान्हवी पाटील आदी विद्यार्थांनी हिंदी दिनाचे महत्व वर्णन केले. हिंदी विषय शिक्षिका भारती तिवारी यांनी हिंदी भाषेचे विपुल साहित्य व साहित्यिक यांचा परिचय करून दिला. हिंदी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या बद्दल तसेच देशाच्या एकटमतेत हिंदी भाषेची भूमिका याविषयी विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य चैताली रावतोळे तर प्रमुख अतिथी म्हणून शाखा व्यवस्थापक जगन गावित व मुख्याध्यापिका नाजनिन शेख होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ शिक्षिका भारती तिवारी, अनुराधा भावे, स्वाती भावे, रमिला गावित, हर्षाली पुरभे, पूनम कासार, शिरीन खाटीक, ग्रीष्मा पाटील, नाजुका भदाणे, गायत्री सोनवणे, सपना पाटील, पुष्पलता भदाणे, लक्ष्मण पाटील, अमोल सोनार, सागर गायकवाड हे सर्व शिक्षकवृंद तसेच सरला पाटील, शितल सोनवणे, इंद्रसिंग पावरा, अमोल पवार हे शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नर्सरी ते दहावी चे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन १० वी ची विद्यार्थीनी मनस्वी पाटील हिने केले.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह