⁠ 
शुक्रवार, एप्रिल 19, 2024

अरे बापरे : महेंद्रसिंग धोनी नाही खेळणार आयपीएलची फायनल ?

जळगाव लाइव्ह न्यूज । २७ मे २०२३ । भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार आणि आयपीएलच्या इतिहासात स्वतःच्या डोक्यावर विजयाचा तुरा मिळवणारा चेन्नई सुपर किंग्सचा सुपरहिरो कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा आय.पी.एल.चा शेवटचा सामना मुकु शकतो.

गुजरात संघावर दणदणीत विजय मिळवत महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग संघाने फायनल मध्ये प्रवेश केला आहे. क्वालिफायर वन या मॅचमध्ये चेन्नई येथे चेन्नई सुपर किंगने गुजरात टायटन ला धूळ चारली. ही हार गुजरात टायटनला चांगलीच जिव्हारी लागल्याचे पाहायला मिळाले कारण पुढच्याच मॅचमध्ये गिलने दणदणीत शतक ठोकून मुंबईला अक्षरशः चितपट केले.

आता फायनल मुकाबला हा चेन्नई सुपर किंग विरुद्ध गुजरात टायटन्स असा होणार आहे. मात्र हा सामना स्वतः महेंद्रसिंग धोनी मुकु शकतो असे म्हटले जात आहे.
सेमी फायनल च्या सामन्यावेळी पथिराना विश्रांती घेतल्यानंतर डावातील १६ ओव्हर टाकण्यासाठी आला. मात्र, नियमानुसार मैदानावर नऊ मिनिटे वेळ घालवल्याशिवाय त्याला गोलंदाजी करता येत नाही. त्याआधी तो मैदानावर आल्याचे केवळ चार मिनिटे झाली होती. हा कालावधी पूर्ण करण्यासाठी धोनी व चेन्नईच्या खेळाडूंनी तब्बल पाच मिनिटे पंचांशी चर्चा केली. या काळात नऊ मिनिटांचा वेळ पूर्ण झाला व पथिराना गोलंदाजी करू शकला.

त्याचवेळी या सामन्यात चेन्नई संघ निर्धारित वेळेपेक्षा संथ गतीने षटके टाकताना दिसला. नियमानुसार कोणत्याही कर्णधाराने दोन वेळा अशी चूक केल्यास त्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात येते. धोनीवर यापूर्वी हंगामात अशी वेळ आली नव्हती.

असे जरी असले तरी देखील जर पंचांनी याबाबत तक्रार केली तर कर्णधार म्हणून धोनीला एक सामना मुकावा लागू शकतो. अशावेळी अजून तरी पंचांनी कोणतीही तक्रार केलेली नाही. मात्र जर अशी तक्रार केलीच तर धोनीच्या फॅन्सच्या माथी निराशा येईल यात काही शंका नाही.