⁠ 
गुरूवार, एप्रिल 25, 2024

राज्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पाऊस ; जळगावाच काय?

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२१ । राज्यातील अनेक भागात पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, राज्यात पुढचे २ ते ३ दिवस, खास करून कोकणात व मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज मुंबई वेधशाळेनं वर्तविला आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात सर्वसाधारण पावसाची शक्यता वर्ताविण्यात आलीय.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर नाशिक, औरंगाबाद, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला आणि नागपूर या जिल्ह्यांत सर्वसाधारण पावसाची शक्यता आहे. तसेच सोमवार पासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.  

एकीकडे राज्यातील काही भागात पावसाने धुमाकूळ घातला असला तर काही जिल्ह्यांमध्ये अद्यापही पावसाने जोरदार हजेरी लावली नाहीय. जळगाव जिल्ह्यात मागील तीन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली नाहीय. जिल्ह्यातील अनेक धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नसल्याने धरणातील पाणी साठा कमी प्रमाणात आहे. परंतु जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचा असलेला हतनूर धरणाचे सर्व ४१ दरवाजे उघडण्यात आले असून तापी नदीला पूर आला आहे.