उन्हाळ्यात ‘ही’ फळे खाल तर डिहायड्रेशन विसरून जाल

मार्च 16, 2023 1:21 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ मार्च २०२३ । उन्हाळा आला की थंड पेय, रसदार फळं, शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात खाल्ल्या जातात. पाणी तर किती प्यायलं जातं याची मोजदादच नसते. पण तरीही जास्त पाणी प्यायल्यानंतरही अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. त्यांच्यासाठीच आम्ही आणल्या आहेत काही टिप्स. ज्या तुम्हाला उन्हाळ्यातही फ्रेश तर ठेवतीलच, पण तुम्हाला डिहायड्रेशनचा त्रास होत असेल तर तो कमी करतील.

fruit jpg webp

उन्हाळा येताच जीवनशैलीत मोठा बदल होतो. हवामानानुसार स्वतःला बदलण्यासाठी जास्त पाण्याचे सेवन केले जाते. उन्हाळ्यात लोकांना खूप तहान लागते, त्यामुळे पाण्याचे सेवन वाढते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात डिहायड्रेशन टाळण्यासाठी फळेही जास्त प्रमाणात खावीत. शरीरातील पाण्याची ही कमतरता काही फळे आणि भाज्यांच्या सेवनानेही भरून काढता येते.

टरबूज किंवा कलिंगड
टरबूजमध्ये ९२ टक्के पाणी असते जे शरीरासाठी खूप उपयोगी असते. यामध्ये व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरातील विविध अवयव निरोगी राहतात.

काकडी
काकडीतही भरपूर पाणी असते जे शरीराची पाण्याची गरज पूर्ण करते. काकडीत व्हिटॅमिन सी आणि फॉलिक ऍसिड असते जे शरीरासाठी खूप फायदेशीर असते.

ताजे संत्र
संत्र हे फळ मुळातच अत्यंत रसदार आहे. यात व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. संत्र्याचा रस पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी खूप उपयुक्त आहे.

डाळिंब
डाळिंबात पाणी तसेच व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि फोलेट असते ज्याचा उपयोग शरीर निरोगी ठेवण्यास होतो. डाळिंबाचा रस पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. एवढे फायदे होणार असतील तर डाळिंब सोलण्याचा त्रास सहन करायला काहीच हरकत नाही का?

सफरचंद
सफरचंदमध्येही भरपूर पाणी असते जे शरीरासाठी खूप उपयुक्त सिद्ध होते. सफरचंदात व्हिटॅमिन सी, फायबर आणि पोटॅशियम असते. याशिवाय सफरचंदात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म देखील असतात, ज्यामुळे हृदय नेहमी निरोगी राहते.

स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी हे अनेकांचे आवडते फळ असते. आंबटगोड चवीचे हे फळ देखील अत्यंत रसदार असते. उन्हाळ्यात स्ट्रॉबेरीचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. यामध्ये ९१ टक्के पाणी असते, यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर, व्हिटॅमिन-सी, फोलेट आणि मॅंगनीज यांसारखे अन्य घटकही असतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now