जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२२ । विज्ञान आणि तंत्रज्ञान च्या युगात आरोग्याच्या आधुनिक सुविधा उपलब्ध आहेत. आपले आणि आपल्या मुलांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. आपण आजारी पडल्यास आरोग्य सुविधांचा उपयोग केला पाहिजे. अनेक नागरिक आज देखील आजारी पडल्यास या सुविधांचा उपभोग घेण्यासाठी तयार नाही. आजारपणात ते बुवाबाजी चे शरण घेतात आणि त्यांना बळी पडतात. या अनुषंगाने वर्ल्ड व्हिजन इंडिया, धरणगाव प्रकल्पद्वारे निशाणे गावात नागरिकांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पालकांना आणि पाल्यांना या कार्यक्रमाद्वारे आरोग्य सुविधांचे महत्व पटवून देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार महसूल विभागाचे लक्ष्मण सातपुते यांनी नागरिकांना आरोग्याविषयी माहिती देत आरोग्य उपचारांचे महत्व पटवून दिले. तालुका आरोग्य विभागाचे निवृत्त अधिकारी जयश्री राव यांनी शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती आणि महत्व पटवून दिले. एकात्मिक बाल विकास प्रकल्प चे सूपरवाइजर राजश्री पाटील यांनी मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी पोषण आहार किती महत्वाचा आहे या विषयी माहिती देत मार्गदर्शन केले आणि त्या विषयी सर्वांना प्रतिज्ञा घेण्यास उत्तेज दिले. वर्ल्ड व्हिजन इंडिया धरणगाव प्रकल्प अधिकारी अनिल बल्लूर्कर आणि विजेश पवार यांनी देखील “मुलांमध्ये आढळणारे धोक्याची ६ लक्षणे याविषयी माहिती देत मार्गदर्शन केले. तसेच भोपाल हून कार्यक्रमाला उपस्थित असलेले वर्ल्ड व्हिजन चे अधिकारी अविनाश दास यांनी मुलांचे अधिकार आणि महिलांचे व पुरुषांचे अधिकार विषयी माहिती देत मार्गदर्शन केले. मुलांचे आरोग्याचे महत्व त्यांना पटवून दिले. निशाणे गावाचे तलाठी पवार साहेब यांनी देखील आरोग्याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे कार्यक्रम संयोजक विजय राऊत यांनी केले. कार्यक्रमाला संस्थेचे स्वयंसेवक रचना जाधव, जी. प. शाळेचे मुख्याध्यापक दिपाली मॅडम, आणि शिक्षक वृंद सोमनाथ विसपुते, अर्चना पाटील, निशाणे गावाचे पोलीस पाटील, ग्राम पंचायत सभासद भगवान ठाकरे तसेच रेमेडियल एज्युकेशन सेंटर चे शिक्षक दिपाली ठाकरे, पूर्वशी पाटील, दिपाली सोनावणे आणि अंगणवाडी शिक्षिका रेखा पाटील, मंगला नेमाडे, सुनंदा चव्हाण, सविता कोल्हे, मंगला पाटील, शोभा नारखेडे, आशा बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते.