बुधवार, नोव्हेंबर 29, 2023

दारूच्या नशेत छातीवर-मानेवर व पायावर मारहाण केली आणि..

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जुलै २०२२ । कामावरून काढून टाकल्याचा राग आल्याने एकाने दारूच्या नशेत शिवीगाळ करून जिवेमारण्याची धमकी देत छातीवर-मानेवर व पायावर मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत पाचोरा पोलिसांत एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विकास विठ्ठल गाडीलोहार (वय ४०, रा. पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा, जळगाव) यांनी पाचोरा पोलिसांत फिर्याद दाखल केली. गाडीलोहार हे पाचोरा येथील वृदावन हॉस्पिटलमध्ये नोकरीला आहे. आरोपी अविनाश उर्फ राजू महाजन रा.कृष्णपुरी पाचोरा यांस वृदावन हॉस्पिटलने कामावरून काढून टाकले. याचा राग आल्याने आरोपी याने फिर्यादीस तू डॉक्टरांच्या सांगण्यावरून मला काढून टाकले म्हणत शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच छातीवर,मानेवर व पायावर मारहाण केली.

याबाबत विकास विठ्ठल गाडीलोहार यांनी पाचोरा पोलिसांत फिर्याद दाखल केली. त्यानुसार संशयित आरोपी अविनाश उर्फ राजू महाजन व पंकज सुनिल पाटील दोघे रा.कृष्णपुरी ता.पाचोरा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भगवान बडगुजर करत आहेत.