हतनूरचे 12 दरवाजे पूर्ण उघडले ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधतेचा इशारा

जुलै 22, 2021 11:01 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२१ । हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने आज सकाळी ७ वाजता धरणाचे बारा दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज दि. २२ जुलै रोजी सकाळी ७ वाजता तापी नदीपात्रात १८१८७ क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत.

hatnur dam

मध्यप्रदेश आणि विदर्भात पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीला पूर आला आहे. यामुळे हतनूर धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे.त्यामुळे आज सकाळी ७ वाजता धरणाचे १२ दरवाजे उघडण्यात आले आहे. 

दरम्यान, धरणातील पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता, जळगाव पाटबंधारे विभाग, जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now