जळगाव लाईव्ह न्यूज । विधानसभा निवडणुकीत लाभ व्हावा म्हणून लाडकी बहिण योजना आणली असल्याची विरोधक टीका करत असून या टीकेवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. लाडकी बहिण योजनाच नाही तर आतापर्यंत अनेक योजना तसेच शासन निर्णय बघितला तर सर्वात जास्त काम करणारे हे सरकार आहे.
विकास काम आणि योजनांचा जर विचार केला तर हे पळणारा आणि धावणारे सरकार आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेमुळेच बहिणीचा आम्हाला फायदा होणार आहेच पण हे तर इतरही विकास कामांमुळे लोकांचा आम्हाला फायदा होणार असल्याचं मंत्री पाटील म्हणले.
जळगाव जिल्ह्याचा जर विचार केला तर जिल्ह्यामध्ये तब्बल अकरा वेळेस येण्याचा रेकॉर्ड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एका जिल्ह्यात एक मुख्यमंत्री 11 वेळेस येतो हे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालं असेल.असंही मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले
जितेंद्र आव्हाडांवर टोला
यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही टोला लगावला आहे. आमचे यश पाहिल्यावर यांच्याकडे एकच विषय आहे की पैसे वाटले दुसरा यांच्याकडे कुठल्याही विषय नाही. या त्यांच्या गोष्टींना भीक घालणारे आम्ही माणसं नाही. आम्ही केलेल्या कामांवर लोकांसमोर जाणाऱ्या आणि मत मागणारे लोक आहोत.आव्हाड यांनी त्यांचा ठाण्याच्या मुंब्रा येथील जागेकडे लक्ष द्यावे, असं मंत्री पाटील म्हणाले.